आता या लाडक्या बहीणींना नाही मिळणार पैसे, काय तुम्हाला यापुढे मिळणार का
आता या लाडक्या बहीणींना नाही मिळणार पैसे, काय तुम्हाला यापुढे मिळणार का

लाखो महिलांसाठी आशेचा किरण ठरलेली लाडकी बहीण योजना आता थोडी कठोर होताना दिसतेय. कारण, अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं उघडकीस आल्यानंतर सरकारने या योजनेची पुन्हा एकदा बारकाईने छाननी करण्याचा निर्णय घेतलाय.
गेल्या सहा महिन्यांपासून विविध टप्प्यांवर ही छाननी सुरूच होती. आता मात्र आणखी एक महत्त्वाची पावले उचलली जाणार आहेत. केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाकडून (Income Tax Department) योजनेच्या लाभार्थी महिलांची माहिती मिळवण्यासाठी राज्य सरकारला परवानगी मिळाली आहे.
यानुसार, आता इनकम टॅक्स रिटर्न (ITR) तपासून पाहिलं जाणार आहे की, महिलांचं वार्षिक उत्पन्न किती आहे. ज्या महिलांनी आयकर भरलेला आहे, त्यांच्या नावांची यादी तयार केली जाईल आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा थांबवण्यात येईल.
या योजनेची सुरुवात करताना सरकारने एक अट घातली होती – कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात अनेक महिलांनी, ज्यांचं उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांनीही या योजनेसाठी अर्ज केलेत.
आता हे थांबवण्यासाठी सरकारने ही नवीन चाळणी लावण्याचा निर्णय घेतलाय – म्हणजे आता खरोखरच गरजू महिलांनाच योजनेचा फायदा मिळेल.