लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस – Mukhyamantri annpurna yojana 2024
लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस - Mukhyamantri annpurna yojana 2024
Mukhyamantri annpurna yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे वारे वाहत आहे.तसेच येत्या निवडणूकीत जोरदार प्रचार देखील केला जात आहे. त्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 अंतर्गत पात्र महिलांना वर्षाला तीन गॅस रिफील मोफत मिळणार आहेत. या योजनेत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थी तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांचा समावेश आहे.
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास योजना सादर केल्या आहे. या अनुषंगाने राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे. आता या योजनेत पात्र महिलांना वर्षाला 3 मोफत गॅस रिफील मिळणार आहेत. योजनेचा लाभ आता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थीं नाही मिळणार आहे.
जाणून घ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना पात्रता निकष
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत:
पात्रता निकष – गॅस जोडणी महिला लाभार्थीच्या नावावर असावी
योजना लाभ एका कुटुंबातील एकच लाभार्थी पात्र
राशन कार्ड पात्रता 1 जुलै 2024 आधी असावे
वजन – प्रत्येक रिफील 14.2 किलो
जाणून घ्या अन्नपूर्णा योजनेचा नेमकां लाभ कोणाला मिळतील?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरुवातीला प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील महिलांना लागू होती. आता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना देखील मोफत गॅस रिफील मिळणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कशी कार्यान्वित होणार?
सध्या 14.2 किलो वजनाचा गॅस रिफील सुमारे 830 रुपयांना उपलब्ध आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थींना 300 रुपये सबसिडी दिली जाते. उर्वरित 530 रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून भरले जातील. या प्रकारे, लाभार्थ्यांना मोफत गॅस रिफील मिळेल.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि उज्ज्वला योजना यामधील फरक
पंतप्रधान मोदी यांनी देशात उज्ज्वला गॅस योजना सुरु केली आहे. त्यामुळे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे, तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाच्या मार्फत राबवली जाणार आहे. त्यामुळे महिलांना संपूर्ण मोफत गॅस रिफील मिळवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या सबसिडीचा लाभ होतो.
योजनेचा अर्ज कसा करावा?
ऑनलाइन अर्ज: अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज भरता येईल.
बँक आणि सेवा केंद्रे: जवळच्या बँक शाखेत किंवा सेवा केंद्रावर जाऊन अर्ज सादर करता येईल.
अन्नपूर्णा योजनेचा उद्देश
महिला आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वयंपाकासाठी सरपणाचा वापर कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सरपण वापराने होणाऱ्या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. या धर्तीवर 2024-25च्या अर्थसंकल्पात ही योजना घोषित करण्यात आली.
महत्त्वाची सूचना: या योजनेसाठी अर्ज करताना गॅस जोडणी महिलांच्या नावावर असणे आवश्यक आहे.