Tech

आता बॅंकेचा OTP मोबाईलवर लवकर नाही येणार, त्यासाठी करावे लागणार हे काम

नवी दिल्ली : आताच्या काळात नव नवीन टेक्नोलाॅजी भारतात येत आहे तसेच इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे संपुर्ण जग जोडले जात आहे. मात्र या वाढत्या इंटरनेट जगतात अनेक प्रकारचे धोके आणि नव-नवे घोटाळे समोर आले आहेत. हे तितकं खरं आहे की स्मार्टफोनने अनेक कामे सोपी झाली आहे. मात्र, सायबर गुन्हेगारांना लोकांची फसवणूक करण्याचे नवीन मार्गही निघत आहेत.

ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढत आहे. यामध्ये लोकांच्या स्मार्टफोनमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी खोट्या ओटीपीचा (Fake OTP) वापर केला जातो. त्यामुळे अनेकवेळा लोकांना मोठ्या प्रमाणात पैशाचे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने अलीकडेच लोकांना फसवणूक आणि ऑनलाइन फसवणूकीपासून वाचवण्यासाठी अनेक उपाय लागू केला आहेत.

आता येत्या १ डिसेंबरपासून नवा नियम लागू

बऱ्याचदा या OTP मेसेजेसचा वापर स्कॅमर्स ओटीपीसारखी युजर्सची खाजगी माहिती मिळवण्यासाठी करतात. त्याचा वापर करून त्यांच्या बँक अकाऊंटपर्यंत पोहचता येते आणि पैसे चोरता येतात. ट्राय नुसार, अनावश्यक प्रोमो मेसेजपैकी काही स्पॅम (Spam message)असू शकतात तर काहींच्या माध्यमातून सायबर स्कॅमर्सद्वारे फिशिंग अटॅक (Scammers Phishing Attacks) करीत आहे.

नवीन नियमांमुळे ओटीपी मेसेज येण्यास वेळ लागू शकतो. तुम्ही बँक किंवा रिजर्वेशन इत्यादी करण्याचा विचार करत असाल तर यासाठी तुम्हाला उशिरा ओटीपी मिळू शकतो. ट्रायने हा निर्णय फेक ओटीपी मेसेजच्या माध्यमातून युजर्सच्या फोनचा अ‍ॅक्सेस घेणाऱ्या आणि त्यांना लुटणाऱ्या स्कॅमर्सना आळा घालण्यासाठी घेतला आहे.

दरम्यान, व्होडाफोन आयडिया (VI), रिलायन्स जिओ, एअरटेल सारख्या टेलिकॉम कंपन्यांनी ट्रेसेबिलिटी नियमांचे पालन न करणारे मेसेज ब्लॉक करण्याच्या संभाव्य अडचणींवर चिंता व्यक्त केली होती. अनेक बँकांसह अनेक टेलिमार्केटर्स आणि बिझनेसेस या गोष्टींसाठी पूर्णपणे तयार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button