Maharashtra

यंदा कोणत्या नक्षत्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या पावसाचे नक्षत्र

यंदा कोणत्या नक्षत्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या पावसाचे नक्षत्र

मुंबई – मे महिन्यापासून अवकाळी पावसाने गोंधळच घातला होता. पण आता, ८ जूनपासून मृग नक्षत्र सुरू झालं आहे – आणि खरं सांगायचं तर, गावागावात एकच चर्चा सुरु झालीय – “मृग नक्षत्र बरसेल का?”, “पेरणी करायची का अजून थांबायचं?”

“मृगाची पेरणी, धनधान्य देई” – परंपरा कायम?
शेतकरी वर्गात एक म्हण आहे – “मृगाची पेरणी, धनधान्य देई”. म्हणजे मृग नक्षत्रात पेरणी केली, तर चांगला फायदा होतो – ही पारंपरिक समजूत आजही टिकून आहे.
यंदाही शेतकरी आशेने बघत आहेत कारण मृग नक्षत्राचं वाहन आहे कोल्हा. जाणकारांचं म्हणणं आहे की, कोल्हा वाहन असलं की पाऊस चांगलाच बरसतो!

पण आता फक्त नक्षत्र नाही, हवामान खात्याचा अंदाजही महत्वाचा!
आता शेतकरी केवळ नक्षत्रांवर नाही तर हवामान खात्याचे अंदाज, मोबाईल अ‍ॅपवरील अपडेट्स यावरही पेरणीचं वेळापत्रक ठरवत आहेत.

उमेश तुमसरे, पालोरा गावचे शेतकरी सांगतात –
“नक्षत्रं बघायची सवय आहे, पण आता अ‍ॅप आणि हवामान खात्याची माहितीही तितकीच महत्त्वाची झाली आहे. आजच्या पिढीला दोन्ही गोष्टी समजून घेऊनच शहाणपणाने पाऊल टाकावं लागतं.”

आधी आलेलं रोहिणी नक्षत्र काय म्हणालं?
२५ मेपासून सुरू झालेलं रोहिणी नक्षत्र हे म्हशीच्या वाहनावर होतं.
पण त्यावेळी जमीन खूपच तापलेली असल्यामुळे त्या पावसाचा उपयोग मशागतीपुरताच झाला. त्यामुळे खरीप पेरणीसाठी सगळ्यांना मृग नक्षत्राचीच वाट पाहावी लागली.

📅 यंदाची नक्षत्रांची यादी – वाहनांसह
🔢 तारखेसुरू 🌟 नक्षत्र 🚜 वाहन

8 जून मृग कोल्हा
22 जून आद्रा उंदीर
5 जुलै पुनर्वसू घोडा
19 जुलै पुष्य मोर
2 ऑगस्ट आश्लेषा गाढव
6 ऑगस्ट मेघा बेडूक
30 ऑगस्ट पूर्वा म्हैस
13 सप्टेंबर उत्तरा कोल्हा
27 सप्टेंबर हस्त मोर
10 ऑक्टो. चित्रा हत्ती
24 ऑक्टो. स्वाती बेडूक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button