सुहास कांदें – समीर भुजबळा यांच्यात मोठा राडा
नवी दिल्ली : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 – आज महाराष्ट्रासाठी उत्सव आहे. देशातील महाराष्ट्रात आज 288 जागांसाठी विधानसभा निवडणुकीचे आज राज्यभरात मतदान होणार आहे. राज्यात काही ठिकाणी अत्यंत शांततेत मतदान प्रक्रिया होत आहे, तर काही ठिकाणी मोठा राडा बघवयास मिळत आहे. आज नांदगाव विधानसभा मतदारसंघात गालबोट लागले आहे.
आताची घडीची मोठी बातमी समोर येत आहे. नांदगावसाठी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्यात मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी अडवले. यावळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.
नेमकं काय घडले,
नांंदगाव तालुक्यातील मतदार बाहेर गावी कामा निमित्त गेलेले होते, आज मतदानासाठी सुहास कांदे यांनी काही लोकांना बोलावले होते.यानंतर बाहेर गावी गेल्या मतदरांनी गाडी करुन मतदान करण्यासाठी नांदगावचा रस्ता घरला, यानंतर वाटेत या कामगाराच्या गाड्या समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी अडवल्या. यावेळी सुहास कांदे तिथे आले यावेळी समीर भुजबळही तिथे उपस्थित होते. या दोन्ही उमेदवारामध्ये मोठा राडा झाला. यावेळी सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना \” तुझा मर्डर फिक्स \” अशी धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.
नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला. या ठिकाणावरुन कुठल्याही परिस्थितीत मतदार जावू देणार नाही, असा पवित्रा भुजबळांनी घेतला होता. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे हे दोघेही आमनेसामने आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
यावेळी काहीवेळ मोठा गोंधल उडाला होता. पोलिसांनी मोठा बंदोबस्त मागवून या ठिकाणी झालेली गर्दी पांगवली. सुरुवातील सुहास कांदे यांच्या कार्यकर्त्यांनी एक बस भरुन मतदारांना आणले होते. यावेळी ही बस समीर भुजबळ यांनी अडवली. यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. मोठा गोंधळ निर्माण झाला.
नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे सुहास कांदे निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या विरोधात समीर भुजबळ अपक्ष निवडणूक लढत आहेत.