महाराष्ट्रात तुफान राडा, पहा तुमच्या जिल्ह्यात कोणी कोणाला फटकावलं
नाशिक – नाशिकच्या नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना तुझा मर्डर फिक्स…, असं म्हणत धमकी दिली आहे. नांदगावमधील हा राडा सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे, सुहास कांदे यांनी बोलाविलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवलं आहे. यावेळी समीर भुजबळ आणि सुहास कांदे समोरासमोर आहे. नांदगाव – मनमाड रस्त्यावरील प्रकार आहे. यावेळी दोन्ही गटात जोरदार राडा पाहायला मिळाला. गुरुकुल कॉलेज परिसरातून मतदार मतदानाला निघाले होते. समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना अडवलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप समीर भुजबळ यांनी केला आहे. तर सुहास कांदे यांनी मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी व्यवस्था केल्याचं सांगितलं आहे.
वर्धा – वर्धा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी नितेश कराळे यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नितेश कराळे यांना मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, यानंतर नितेश कराळे यांनी आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
मुंबई – मुंबईच्या सायन कोळीवाड्यात बुथवर भाजपच्या दिग्गज नेत्यांची पोलिसांसोबत गोंंधळ उडाला आहे. या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत भाजप नेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांची पोलिसांसोबत बाचाबाची सुरु असल्याचं स्पष्ट दिसत आहे. भाजपने या घटनेनंतर पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा भाजपचा आरोप आहे. पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना मदत केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे.
बीड – परळीतील एका मतदान केंद्राबाहेर काही लोकांची टोळी एका तरुणाला मारहाण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने हा व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. यासह दावा केला आहे की, मारहाण करणारे लोक भाजपाचे कार्यकर्ते व धनंजय मुंडेंचे समर्थक आहेत. तसेच ज्या व्यक्तीला मारहाण होत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील (शरद पवार) पदाधिकारी आहे.
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोप-प्रत्यारोपामुळे राजकारण तापलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ दानवे यांनी त्यांच्या एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. यामध्ये संजय शिरसाट हे एका पदाधिकाऱ्याला शिवीगाळ करत असल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे.यानंतर अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट हे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना धमकी देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
धुळे – धुळ्यामध्ये भाजप आणि वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये राडा, पैसे वाटपाच्या संशयावरून कार्यकर्ते भिडले, कार्यकर्ते पोलीसांच्या ताब्यात
पुणे – उल्हासनगर मध्ये भाजप उमेदवार मध्ये भाजप उमेदवार कुमार अहिराणी पैसे वाटप असल्याचा अरोप असत मतदारांनी अहिराणी याच्या कार्यालयासमोर केली तुफान गर्दी…… पैसे वाटपाचा आरोप केला आहे.
खामगाव – मवियाचे खामगावचे उमेदवार दिलीप सांनदा यांना लोकांनी हकलुन लावले, तसेच दिलीप सांनदा यांच्या गाडीवर दगड फेक झाल्याची माहिती समोर येत आहे.
सातारा – साता-याच्या कोरेगावमधील भोसे मतदान केंद्रावर बाचाबाची, शशिकांत शिंदे आणि महेश शिंदेंच्या कार्यकर्यांमध्ये तुफान राडा
बीड आष्टी – आष्टीमध्ये सुरेश धस आणि मेहबुब शेख समर्थकांमध्ये हाणामारी, भाजप आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले
यवतमाळ – सुकळीमध्ये सरपंचावर प्राणघातक हल्ला
भंडारा – भंडाराच्या मोहाडीमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट आपापसात भिडलेल्या आहेत दादा गडाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना गाडीतून मतदानासाठी नेलं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला आणि दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना त्यानंतर धक्काबुक्की केली भंडारा पोलिसांच्या मध्यस्थी नंतर वातावरण आता शांत झालेले आहे.
संभाजीनगर – संभाजीनगरच्या अल्फांसो मतदान केंद्रावर लाठीचार्ज ची घटना घडली ठाकरेचे उमेदवार राजीव शिंदे यांचा लाठी चार्ज झाला लाठी चार्ज नंतर राजीव शिंदे यांचा काही काळ ही आंदोलन देखील झालाय गर्दी बनवण्यासाठी पोलिसांनी लाटी चार्ज केल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे.