Maharashtra

ब्रेकिंग न्यूज, सत्तेच्या बाहेर राहण्याचा एकनाथ शिंदेंचा विचार

ब्रेकिंग न्यूज, सत्तेच्या बाहेर राहण्याचा एकनाथ शिंदेंचा विचार

रायगड – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडून निकालही समोर आला. पण, निकाल लागल्यानंतर मात्र अद्यापही राज्यात सत्तास्थापना झालेली नाही. खातेवाटपाटचा तिढा सुटला नसल्यामुळं ही प्रक्रिया लांबणीवर पडत असल्याचं चित्र असतानाच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. तसेच राज्यात मंत्री वाटपच्या पदावरुन धुसफुस सुरु असतांना व राज्यात सरकार स्थापन करण्याची तारीख 5 डिसेंबर ठरली आहे. मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो असं एकनाथ शिंदे यांनी आमच्याशी चर्चा करताना सांगितले होते, परंतु आम्ही सर्वांनी आग्रह केला. तुम्ही सत्तेबाहेर राहून नव्हे तर सत्तेत राहून काम करायचा असं विधान शिवसेना नेते आमदार भरत गोगावले यांनी केले आहे.

गोगावले रायगड येथील पत्रकार परिषदेत म्हणाले की, आमच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांना सत्तेत राहण्याचा आग्रह केला. तेव्हा मला २ दिवस गावी जाऊन येऊ द्या, मला थोडं निवांत राहून विचारविनिमय करू द्यावा.

आमच्या सगळ्यांचा आग्रह हा त्यांनी सत्तेत राहावा यासाठी आहे. उपमुख्यमंत्री कोण याबाबत आता काही सांगू शकत नाही. सर्वस्वी जबाबदारी आम्ही मुख्यमंत्र्‍यांवर सोपवली आहे. ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावंद्य आहे. सत्तेच्या प्रक्रियेत साहेबांनी सहभागी व्हावं हेच आम्हाला वाटते असं त्यांनी स्पष्ट केले.

५ डिसेंबरला शपथविधी करायचा आहे, त्याची तयारीही आझाद मैदानावर सुरू आहे. त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊनच हे सगळं होतंय, कुणाला बाहेर ठेवलं जातंय हे म्हणणं चुकीचे आहे असंही भरत गोगावले यांनी म्हटलं. तसेच ज्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचा त्यांनी शपथविधी कधी ठेवायचे हे ठरवणं गरजेचे असते, विश्वासात न घेता शपथविधी घेतला जातोय हे म्हणणं बरोबर नाही. दिल्लीला बैठक झाली, तेव्हा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अमित शाह, जे.पी. नड्डा तिथे काही तरी ठरल्याशिवाय अशी तारीख दिली जाणार नाही.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी महत्वाची माहिती दिली जे होईल ते चांगले होईल, आमच्या तिन्ही पक्षात कुठेही कटुता नाही. चांगल्याप्रकारे सरकार स्थापन होईल. संख्याबळ पाहता भाजपाचे आमदार जास्त आहेत. एवढी संख्या असताना आम्ही हट्ट धरणे आमच्या स्वभावात नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी हसत हसत सांगितले, भाजपाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर माझा काही अडथळा नाही ते जाहीर केलंय, त्यामुळे नाराजीच्या चर्चेला अर्थ नाही. राजकारणात कधी काय घडेल हे कुणी सांगू शकत नाही असंही भरत गोगावले यांनी सांगितले.

सोमवारी दुपारी ही महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी किंवा त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सदर बैठकीत प्रामुख्याने पाहिली टर्म तरी मुख्यमंत्री पद मिळावं किंवा गृहमंत्री पद शिवसेनेच्या वाट्याला यावं यावर महत्वाची चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button