मोदीसाहेब कुठे घोडं अडलं, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
Eknath Shinde मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत सर्वांची . भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेंच सुरु आहे. मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे. राज्यात मुख्यमंत्रीपदाचा सस्पेंस कायम असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस झाले असून अजूनही मुख्यमंत्रीपदाचा निर्णय महायुतीत झाला नसल्याची चर्चा होती.
आज पत्रकार परिषद घेत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे म्हणाले की, तुम्हाला वाटत असेल कुठे घोडं अडलं. मी मोकळा माणूस आहे. मी धरून ठेवणं, ताणून ठेवणं असा माणूस नाही. मला लाडका भाऊ हे पद मिळालं.
ही माझी मोठी ओळख तयारी झाली आहे. काल मी मोदींना फोन केला होता. मी त्यांना सांगितलं सरकार बनवताना निर्णय घेताना कुठलं काही अडचणीचं अडचण आहे, माझ्यामुळे किंवा कुणामुळे असं मनात आणू नका. तुम्ही मदत केली. अडीच वर्ष संधी दिली. तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल.’
\’\’एकनाथ शिंदे म्हणाले की,’एनडीए आणि महायुतीचे प्रमुख म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय भाजपला अंतिम असेल तसा आम्हालाही अंतिम असेल. निर्णय घेताना माझी अडचण आहे का असं वाटू देऊ नका. एकनाथ शिंदे काही अडचण आहे का असं वाटू देऊ नका. सरकार बनवताना माझा अडसर ठेवू नका. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. मला मान्य असेल. मी मोदी आणि शाह यांना फोनवर सांगितलं.’\’
‘भाजपला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. आमची बैठक होणार आहे. भाजपची बैठक होणार आहे. त्यात ते निर्णय घेतील. कोंडी, अडसर, नाराजी नाही आहे. स्पीड ब्रेकर नाही. नाराजी नाही. जो निर्णय भाजपचे दिल्लीतील नेते घेतील त्याला आमच्या शिवसेनेचा पाठिंबा असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
जीवन में असली उडान बाकी है अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन अभी तो सारा असमान बाकी है असं देखील शिंदे म्हणाले. अजून खूप काम करायचं आहे. राज्याला विकासाकडे न्यायचं आहे. मोदींनी देशाचं नाव जगभर रोशन केलं. आज देश आत्मनिर्भर झाला आहे. आत्म सन्मान झाला आहे. आपले रिलेशन इतर देशांसोबत डेव्हलप झाले आहेत. त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल. त्यामुळे कोणती कोंडी काही राहू नये हे सांगण्यासाठी बोलावलं आहे. त्यामुळे वरिष्ठ जे निर्णय घेतील, तो मान्य असेल.