तुम्ही कॅन्सल चेक दिलाय तर त्यांना पैसे काढता येऊ शकतात का? नेमकं ‘हा’ चेक कोण कोणत्या कारणांसाठी वापरला जातो ?
तुम्ही कॅन्सल चेक दिलाय तर त्यांना पैसे काढता येऊ शकतात का? नेमकं ‘हा’ चेक कोण कोणत्या कारणांसाठी वापरला जातो ?
नवी दिल्ली – Bank Cheque Viral News : सध्या देशात घराबाहेर पडायचं म्हटलं की खिशात पैसे लागतात नाही पैसे तर स्मार्ट फोन तरी खिशात असवा लागतो, स्मार्टफोनमुळे सध्याच्या काळात पैशांचा व्यवहार करण्यासाठी डिजिटल बँकिंगचा वापर होतोय. आता प्रत्येक पैशांचे व्यवहार नेट बँकिंग आणि यूपीआय सारख्या प्लॅटफॉर्ममुळे सोपे झाले आहेत.यूपीआय प्लॅटफॉर्ममुळे रोखीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. अलीकडे शहरापासून तर खेड्या पर्यंत सुद्धा यूपीआयचा वापर सर्यास होतोय.
यामुळे देशात अनेक कंपण्यांनी आपले डिजिटल प्लॅटफॉर्म लाॅन्च केले आहे. यात फोन पे, गुगल पे, पेटीएम सारख्या प्लॅटफॉर्मने मोठ्या प्रमाणात मार्केट काबिज केले आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे पैशांचे व्यवहार करणे सोपे झाले आहेत. बाजारात अगदी छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या वस्तू खरेदी करायची असेल तरीदेखील यूपीआयने पेमेंट केले जात आहे.
यूपीआयचा वाटा मोठा असला तरी आजही अनेक ठिकाणी पैशांचे व्यवहार करण्यासाठी चेकचा वापर होताना दिसतो. दरम्यान आज आपण चेकने व्यवहार करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
तुम्हाला बहुतांश वेळा अनेक कामांसाठी कॅन्सल चेक चा वापर करावा लागतो. यात अनेकदा कर्ज घेताना,लाईट बिल, पॉलिसी खरेदी करताना, किंवा नवीन नोकरी मिळाल्यानंतर किंवा इतर कोणत्याही आर्थिक बाबींसाठी कॅन्सल चेक मागितला जातो.
मात्र तुम्हाला याच कॅन्सल चेक संदर्भात प्रश्न पडला असेल ? जसे की कॅन्सल चेक चा वापर करून खात्यातून पैसे काढता येऊ शकतात का? हा मोठा सवाल ग्राहकांकडून उपस्थित केला जात असतो.
आज आपण जाणून घेणार आहोत की कॅन्सल चेकचा नेमका वापर कशासाठी होतो आणि याचा वापर करून पैसे काढता येऊ शकतात का? याची सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न या बातमीच्या माध्यमातून करणार आहोत.
कॅन्सल चेक दिल्यानंतर त्यांना पैसे काढता येतात का?
जवळ पास अनेकांना कॅन्सल चेक मागितल्याबरोबर गोंधळ निर्माण होत असतो. या चेकचा काही गैरवापर तर होणार नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की कॅन्सल चेकचा मिस गैरवापर होऊ शकत नाही. या चेकचा वापर करून कोणालाही पैसे काढता येणे अशक्य आहे.देशातील कोणतीचं बँक कॅन्सल चेक स्वीकारून पैसे देत नाही.
तुम्हाला पुन्हा प्रश्न पडला असेल पैशांसाठी होत नाही तर मग कॅन्सल चेकचा वापर कशासाठी होतो?
विमा पॉलिसी खरेदी करताना देखील हा चेक मागितला जातो. गृह कर्ज वैयक्तिक कर्ज किंवा वाहन कर्ज घेताना बँका ग्राहकांकडून कॅन्सल चेक मागवतात. याशिवाय इतरही अन्य कामांमध्ये या चेकचा वापर होतो. पण या चेकचा वापर हा पैसे काढण्यासाठी होत नाही.
जाणकार लोक सांगतात की कॅन्सल चेक मध्ये खातेदाराचे नाव, बँकेच्या शाखेचे नाव आणि पत्ता, खाते क्रमांक आणि बँकेचा IFSC कोड असतो. ही माहिती बँक खाते धारकाची पडताळणी करण्यासाठी आवश्यक असते. हेच कारण आहे की वित्तीय कामांमध्ये कॅन्सल चेक मागितला जातो.
एकंदरीत माहितीची पडताळणी करण्यासाठी कॅन्सल चेक मागितला जातो यामुळे याचा मिसयूज होणे अशक्य आहे. कॅन्सल चेक तयार करताना तुमच्या चेक बुक मधून एक चेक काढा त्यावर दोन समांतर रेषा ओढा आणि त्यामध्ये कॅन्सल (Cancelled) असे लिहा. त्यामुळे तुमचा चेक रद्द होतो आणि या चेकला कॅन्सल चेक म्हणून ओळखले जाते.