फक्त १ लाखाचे झाले ८० करोड, पठया बनला रातोरात कोट्याधीश
फक्त १ लाखाचे झाले ८० करोड, पठया बनला रातोरात कोट्याधीश

मुंबई – कधी कुठल्या क्षणी नशिबाचे दरवाजे उघडतील, हे खरंच सांगता येत नाही. शेअर बाजार म्हणजे सट्टा नाही, तर संयम, विश्वास आणि दीर्घकालीन दृष्टी ठेवून केलेली गुंतवणूक किती मोठा परतावा देऊ शकते याचं ताजं उदाहरण नुकतंच समोर आलं आहे.
घरात अचानक सापडलं एक जुनं कागदपत्र… आणि आयुष्य बदललं!
एका रेडिट युजरने सोशल मीडियावर एक भन्नाट पोस्ट टाकली – त्यांच्या वडिलांनी १९९५ साली JSW Steel कंपनीचे शेअर्स विकत घेतले होते. तेव्हा सगळी गुंतवणूक फक्त १ लाख रुपये. त्यानंतर वर्षं सरत गेली, ते सर्टिफिकेट कुठेतरी घरातल्या फाईलमध्ये हरवून गेलं… आणि सगळे त्याला विसरलेसुद्धा.
आता तब्बल ३० वर्षांनंतर ते सर्टिफिकेट सापडलं – आणि कागदाचा तो तुकडा अक्षरशः सोनं ठरला. कारण त्या शेअर्सची आजची बाजारमूल्य म्हणजे चक्क ८० कोटी रुपये!
गुंतवणूक, संयम आणि योग्य कंपनी – यांची ताकद
शेअर बाजारात चढ-उतार असतात, पण जर आपण मजबूत पाया असलेल्या कंपनीत गुंतवणूक केली, आणि ती दीर्घकाळ टिकवून ठेवली, तर ते फायदेशीर ठरतं – हे उदाहरण हे सिद्ध करतं.
सौरव दत्ता या गुंतवणूकदाराने या घटनेबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यानंतर एकाच दिवशी ती पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. कमेंट्समध्ये लोक म्हणतात –
“चांगला बिझनेस विकण्याची घाई करू नका”
“वेळेला त्याचं काम करू द्या”
“आता हा माणूस निवृत्ती घेऊन शांत आयुष्य जगू शकतो”
JSW Steel चा शेअर
आजच्या घडीला JSW Steel ही तब्बल 2.47 लाख कोटींची कंपनी आहे, म्हणजेच भारतातील मोठ्या कंपन्यांच्या यादीत वरच्या रांगेतली.
सोमवारी या कंपनीच्या शेअरची किंमत होती ₹1009.50, पण खरी मजा तर त्याने दीर्घकाळात दिलेल्या परताव्यात आहे!
20 वर्षात: तब्बल 2484.34% परतावा!
5 वर्षात: जवळपास 433.69% नफा!