Sarkari Yojana

आता महिलांना मिळणार दरमहा ७००० रुपये; असा करावा लागणार अर्ज, जाणून घ्या माहिती…

आता महिलांना मिळणार दरमहा ७००० रुपये; असा करावा लागणार अर्ज, जाणून घ्या माहिती...

नवी दिल्ली – LIC Bima Sakhi Yojana : महिलांना सक्षम बनवण्यासाठी सरकार सातत्याने नवनवीन योजना राबवत असते. अशाच एका खास उपक्रमाचा भाग म्हणून आता सरकारने ‘एलआयसी विमा सखी योजना’ सुरू केली आहे – विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी.

ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ डिसेंबर २०२४ रोजी हरियाणामध्ये सुरू केली. यामध्ये महिलांना भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) मार्फत प्रशिक्षण दिलं जातं आणि विमा एजंट म्हणून काम करण्याची संधी दिली जाते. यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणं.
या योजनेत महिलांना काय लाभ मिळतो?

३ वर्षांचं प्रशिक्षण:
महिलांना तीन टप्प्यांत प्रशिक्षण दिलं जातं.

पहिलं वर्ष: दरमहा ₹७,००० स्टायपेंड

दुसरं वर्ष: दरमहा ₹६,००० स्टायपेंड

तिसरं वर्ष: दरमहा ₹५०० स्टायपेंड

➤ एकूण मिळणारी रक्कम ₹२ लाखांपेक्षा जास्त

कमिशनची कमाई:
प्रशिक्षणाच्या दरम्यान महिलांना पॉलिसी विक्रीवर कमिशनही मिळतं. पहिल्या वर्षीच सुमारे ₹४८,००० पर्यंत कमिशन कमावण्याची संधी असते.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर:
महिलांना ‘विमा सखी’ प्रमाणपत्र आणि एलआयसी एजंट कोड दिला जातो. म्हणजेच, त्या अधिकृत एलआयसी एजंट म्हणून काम सुरू करू शकतात.

अर्ज कसा करायचा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.

ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही – तर महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं व्यासपीठ देते, जे त्यांच्या आत्मविश्वासात आणि सामाजिक सहभागात खूप मोठी भर घालते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button