Business

आज सोन्याचे भाव धडकन कोसळले, जाणून घ्या २२ व २४ कॅरेट सोन्याचा दर

आज सोन्याचे भाव धडकन कोसळले, जाणून घ्या २२ व २४ कॅरेट सोन्याचा दर

नवी दिल्ली : दिवसेंन दिवस सोन्याचे भाव वाढच चालले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना सोनं खरेदी करणे जिक्रीचे होत चालले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या ( 7 जून 2025 रोजी शनिवारी सोन्याच्या भाव कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याचे भाव १६३० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे. ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी आज उत्तम संधी आहे.

येत्या मंगळवारी वटपोर्णिमा सण आहे. त्यामुळे सध्या सणासुदीचा मोहोल आहे. या दिवशी अनेकजण सोने खरेदी करतात. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे वाढते दर पाहून ग्राहकांना चिंता वाटत होती. मात्र, आज हे दर कमी झाले आहेत ग्राहाकांमध्ये आंनदाचे वातावरण आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

सोन्याच्या दरात १५०० रुपयांनी घट झाली असून आज १० ग्रॅम सोन्याचे दर ८९,८०० रुपये प्रति तोळा आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,८४० रुपये झाले आहेत. या दरात १२०० रुपयांनी कपात झाली आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24K Gold Rate Today)

२४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत आज १६३० रुपये प्रति तोळा घट झाली आहे. आज सोने प्रति तोळा ९७,९७० रुपयांवर विकले जात आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,३७६ रुपये आहे. या दरात १३०४ रुपयांनी घट झाली आहे. सोन्याचे दर आज चांगलेच उतरले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा १२२० रुपयांनी घट झाली आहे. आज एक तोळा सोने ७३,४८० रुपयांवर विकले जात आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचे दर ५८,७८४ रुपये आहे. या दरात ९७६ रुपयांनी घट झाले आहेत.

चांदीचे दर (Silver Rate)

आज चांदीच्या दरात काहीही बदल झालेला नाही. चांदीचे दर स्थिर आहे. ८ ग्रॅम चांदीचे दर ८५६ रुपये आहेत. १० ग्रॅम चांदीचे दर १०७० रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीचे दर १०,७०० रुपये आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button