Maharashtra

अखेर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का ? काय म्हणाले अजित पवार

अखेर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का ? काय म्हणाले अजित पवार

मुंबई : लाडक्या बहिणींना सध्या 1500 रुपये प्रतिमहिन्याप्रमाणे मिळत आहे. मात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपये नक्की मिळतील असं आश्वासन सरकारमधील नेते, मंत्र्यांतर्फे देण्यात आलं. आता अजित पवारांनी याबद्दल मोठं विधान केलं आहे. तसेच आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेतील वाढीव पैशांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. पण ही योजना बंद होणार नाही,

मागील वर्षी शेवटच्या टप्यात अर्थसंकल्पात महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ‘ सुरु केली. महिलांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी सरकारने सदर योजना अमलात आणली, या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना प्रतीमहा 1500 रुपये देण्यात येतात.आता ऐवढ्यातच 9 वा हफ्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहेत. सद्या या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं बोललं जात आहे. मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलो तर लाडक्या बहिणींना 1500 रुपये नाही तर 2100 रुपये दरमहिन्याला देऊ असे आश्वासनही महायुतीच्या नेत्यांनी दिल होतं.

विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली आणि महायुती सरकार भरघोस मतांनी पुन्हा निवडून आलं. विधानसभेचा निकाल लागून आणि सरकार स्थापन होऊन आता 3 ते 4 महिने होत आले. मात्र त्यानंतरही लाडक्या बहिणींना दरमहिना 2100 रुपये मिळालेले नसून ते पैसे कधी मिळणार असा सवाल लाभार्थी महिलांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वच जण करत आहे.

विरोधकांनी तर या मुद्यावर सरकारला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला. तसेच सरकार इतर योजनेचे पैसे या योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेतील वाढीव पैशांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. पण ही योजना बंद होणार नाही, लाडक्या बहिणींना 2100 रुपये नक्की मिळतील असं आश्वासन सरकारमधील नेते, मंत्र्यांतर्फे देण्यात आलं. पण तो दिवस कधी उजाडणार हे काही स्पष्ट झालेलं नाही.

आता याच अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं, सूचक विधान केलं आहे. लाडक्या बहिणीला आपण 1500 रुपये देतोय, पण परिस्थिती सुधारली की त्यात पुढील विचार करणारा असं अजित दादा म्हणाले. पण ती वेळ नेमकी कधी येणार आणि महिलांना 2100 नेमके कधी मिळणार हे मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलेले नसून ते अद्याप गुलदस्त्यातच आहे. बीडमधील कार्यक्रमात ते बोलत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button