एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाऐवजी मागितलं मोठं घबाड,द्याचे असेल तर हे द्या
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाऐवजी मागितलं मोठं घबाड,द्याचे असेल तर हे द्या
मुंबई : Eknath Shinde Meets Amit Shah : राज्यात विधानसभेचा निकाल लागून जवळ-जवळ 7 दिवस पुर्ण होत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा जोरदार रंगली होती. त्यानंतर अजूनही सरकार स्थापन होऊ शकले नाही. महायुतीमधील तिन्ही पक्ष शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद अजूनही संपले नसल्याची चर्चा आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाऐवजी मोठ्या पदाची मागणी केली आहेत.
एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे आपली बाजू मांडत विधानसभा अध्यक्षपद आणि 12 मंत्रिपदे मागितल्याचे वृत्त आहे. त्यातच गृह आणि अर्थ खातेही एकनाथ शिंदे यांनी हवे आहे. या दरम्यान मुंबईत महायुतीची होणारी बैठकही रद्द झाली आहे. एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी आपल्या गावी निघून गेले आहेत. आता ही बैठक 1 किंवा 2 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी या मागण्या
मागील काळात मी म्हणजेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांना त्यावेळी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते तसेच त्यांच्याकडे गृह आणि अर्थखाते होते. ही खाती एकनाथ शिंदे यांना हवी आहे. तसेच विधानसभा अध्यक्षपदही त्यांना हवे आहे. परंतु भाजप यासाठी तयार नाही. त्यामुळे युतीमध्ये तडजोड कशी होणार? हा प्रश्न पडला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासमोर पालकमंत्रीपदाचा विषय ठेवला आहे. पालकमंत्रीपदाची जबाबदारी देताना शिवसेनेचा योग्य तो सन्मान ठेवण्याची मागणी केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी काय सांगितले…
अमित शाह यांच्या भेटीबाबत एकनाथ शिंदे यांनी एएनआयशी संवाद साधला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले होते की, मी पत्रकार परिषदेत माझी भूमिका स्पष्ट केली आहे. महायुतीत मुख्यमंत्रीपदावरुन कोणतेही मतभेद नाही. लाडका भाऊ हे पद मला कोणत्याही पदापेक्षा मोठे आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय आपणास मान्य राहणार असल्याचे आपण यापूर्वीच सांगितले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी गुरुवारी महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक दोन तास चालली . त्या बैठकीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, जे.पी.नड्डा उपस्थित होते. या बैठकीपूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. त्यानंतर शुक्रवारी हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावी निघून गेले. त्यामुळे राज्यात विविध प्रकारची चर्चा सुरु झाली आहे.