काही झालं तरी दिल्लीला जाणार नाही, पाहिजे तर हेच खाते पाहिजे एकनाथ शिंदेची मागणी ?
काही झालं तरी दिल्लीला जाणार नाही, पाहिजे तर हेच खाते पाहिजे एकनाथ शिंदेची मागणी ?
मुंबई : Shiv sena wants Home ministry एकनाथ शिंदे केंद्रात जाणार नाहीत, हे स्पष्ट आहे. राज्यातील सर्वसामान्य लोकांसाठी ‘कॉमन मॅन’ अशी ओळख असलेल्या शिंदे यांनी दिल्लीला जाणे अशक्य असल्याचे माहिती शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मात्र, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
महत्त्वाच्या खात्यांची मागणी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत एकनात शिंदे यांनी केल्याची माहिती मिळत आहे.यात गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे,विशेषतः गृहखाते शिवसेनेकडेच असावे, अशी भूमिका शिरसाट यांनी बोलतांनी स्पष्ट केली.
राज्यात मागील काही काळात झालेल्या दंगली, जातीआधारित आंदोलने आणि ओबीसी-मराठा आंदोलनांसारख्या संवेदनशील प्रकरणांमध्ये शांतता राखण्यासाठी गृहखाते सक्षम नेत्याकडे असावे, अशी अपेक्षा शिरसाट यांनी व्यक्त केली.
शांतता राखणारा गृहमंत्री हवा “महाराष्ट्रातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शिवसेनेला गृहखाते मिळणे गरजेचे आहे. महायुतीच्या विजयात आमचा मोठा वाटा आहे, त्यामुळे योग्य त्या खात्यांची वाटप करताना आमची मागणी मान्य होईल, अशी अपेक्षा आहे,” असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.
शिंदे यांचे राजकीय अंदाज “एकनाथ शिंदे फकीर टाईप व्यक्ती आहेत. ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील का, हा प्रश्न त्यांच्या स्वभावावर अवलंबून आहे. ते केवळ पक्षाचे प्रमुख म्हणूनही राहू शकतात किंवा दुसऱ्या एखाद्या नेत्याला पुढे करण्याची शक्यता आहे,” असे शिरसाट म्हणाले. मात्र, उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेलाच मिळाले पाहिजे, यावर त्यांनी ठाम भूमिका मांडली.
शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यामुळे भाजपाच्या बाजूने मोठा तोल राखला आहे. आता राज्यातील सत्तासमीकरण कसे बनते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.