तुमचं मूल वाहन चालवत असेल तर सावध व्हा, आता तब्बल 25 वर्षापर्यंत नाही निघणार लायसन्स
नवी दिल्ली : आता तुमचं ही लहान मूल वाहन चालवत असेल तर सावध व्हा कारण आता तुमच्या मुलाला 25 वर्षापर्यंत वाहन चालवण्याबाबत लायसन मिळणार नाही, अल्पवयीन मुलाने वाहन चालवल्यास त्याला शिक्षा झाली तर तब्बल 25 वर्षापर्यंत लायसन्स न देण्याचा निर्णय सध्या परीवाहन विभागाने घेतला आहे,
तर तब्बल 25 वर्षापर्यंत लायसन्स न देण्याचा निर्णय
मागील काही काळापासून या कायद्याची अंमलबजावणी होत नव्हती प्रत्येक वेळेस पालक आपल्या लहान मुलांना वाहन चालवण्यासाठी वाहन हातात देत होते. मुलांनी काही चुका केल्यास पालक दंड भरुन मोकळे होत असायचे त्यानंतर गुन्हा करूनही अल्पवयीन मुलांना लायसन्स मिळवायचे याची उचल घेऊन परिवहन विभागाने ऑफिशियल वेबसाईट सारथी प्रणालीच्या नियमामध्ये आवश्यक बदल करून घेतले आहे.
त्यामुळे आता लहान मुलांना वाहन चालवल्यास लर्निंग लायसन्स निघणार नाही पाठीमागे पुण्यातील कल्याणी नगर मध्ये अल्पवयीन ( मुलगा 17 वर्षांचा ) मुलाने पोर्शे लक्झरी कारने मोटर सायकल चालवत असलेल्या दोघांना जोरदार ठोक्कर देऊन ठार केलंय होतं या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेने देशाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे परिवहन मंडळाने यापार्श्वभुमीवर मोटर वाहन कायद्यातील अल्पवयीन वाहन चालकांच्या संदर्भातील कायद्याचा प्रश्न अंमलबजावणीवर उपस्थित झाला आहे.
पुण्यातील पोर्शे लक्झरी कारचा संदर्भ
विशेष म्हणजे जो वाहन कायदा आहे 1989 च्या कलम 199 पाच नुसार 18 वर्षाखालील लहान मुलांनी वाहन चालवल्यास मुलाचे पालक किंवा मोटर वाहनाचा मालक दोघांनाही दोषी मानले जाते यात 25 हजारांपेक्षा जास्त दंडसह पालक किंवा मोटर गाडी मालकाला तीन वर्षापर्यंतची कारावासाची तरतूद आहे त्यामुळे अल्पवयीन मुलांना वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत वाहन परवाना देण्याची तरतूद आहे परंतु नागपुरात तरी या कायद्याचे अंमलबजावणी केवळ दांडात्मक कारवाई पुरतीच मरत राहायची असंख्य असे गुन्हा करूनही अनेकांना लायसन मिळायचे याच्यात तक्रार देखील दिवसेंदिवस वाढत होत्या यामुळे परिवाहन विभागाने पुणे येथील पोर्शे लक्झरी कारचा संदर्भ देत लहान मुलं व अल्पवयीन मुलांना वाहन वाहनांचा वयाच्या पंचवीस वर्षे पर्यंत त्यांना लायसन्स मिळणार नाही
यासाठी परिवहन मंडळाचे प्लॅटफॉर्म असलेल्या सारथी 4.0 मध्ये पुनर्बदल करण्यात आला आहे आरटीओच्या कारवाईकडे महाराष्ट्राचे लक्ष परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक वाहन कार्यालय म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यातील सोमवारी एका पत्राद्वारे झालेल्या बदलाची माहिती दिली आहे पण वाहन चालवणारे जे अल्पवयीन मुलं आहे या मुलांना परवाना प्राप्त होऊ नये याबाबत कारवाई करावी अशी निर्देश देखील देण्यात आले त्यामुळे आरटीओच्या कारवाईकडे आता सर्व संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे